• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्र्वरवासीयांनी केला जवानांचा सन्मान

by Mayuresh Patnakar
August 16, 2023
in Guhagar
122 1
1
Residents of Velaneshwar honored the soldiers
240
SHARES
685
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकसहभागातून माझी माती माझा देश अभियान यशस्वी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : तालुक्यातील वेळणेश्वर वाडदई  ग्रामपंचायतीनेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोह उत्साहात संपन्न झाला.  13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शिलाफलकाचे अनावरण, पंचप्रण शपथ, विरों का सन्मान, वसुधा वंदन, अमृत वाटीका हे सर्व कार्यक्रम ग्रामपंचायतीने लोकसहभागातून यशस्वी केले. जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढली. तर 15 ऑगस्टला ध्वजारोहणानंतर कोळी नृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. Residents of Velaneshwar honored the soldiers

Residents of Velaneshwar honored the soldiers

शिलाफलकाचे अनावरण

वेळणेश्वरमधील पीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेत ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री यांचा विजय संदेश व देशासाठी बलिदान दिलेल्या शुर वीरांच्या स्मृतींना नमन करणारा मजकूर असलेल्या शिलाफलकाचे ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईचे सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, माजी सैनिक बाळकृष्ण गणपत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Residents of Velaneshwar honored the soldiers

पंचप्राण शपथ

शिलाफलकाच्या अनावरणानंतर उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी हातात मातीचे दिवे घेवून पंचप्रण शपथ घेतली. यावेळी हातामध्ये तिरंगा ध्वज घेवून शालेय विद्यार्थी उभे होते. शपथ घेतल्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. Residents of Velaneshwar honored the soldiers

विरों का सन्मान

या उपक्रमांतर्गत वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीने अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, पोलीस दलातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक बाळकृष्ण गणपत शिंदे, स्वातंत्र्य सैनिक कै. गोविंद रूपा जोशी, समाजसेवक कै‌.परशुराम विनायक गोखले, माजी पोलीस अधिकारी दिगंबर सदाशिव घाग, रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असलेल्या दिप्ती दिपक पोळेकर, एस.आर.पी एफ. जवान प्रितम दत्ताराम तांडेल, माजी सैनिक व  तलाठी  निलेश पाटील यांचा समावेश होता. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी त्यांच्या कार्याची माहिती उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. Residents of Velaneshwar honored the soldiers

Residents of Velaneshwar honored the soldiers

वसुधा वंदन

मेरी मिट्टी मेरा देश या अभियानामधील वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत वृक्षारोपण करण्यात आले.  तसेच मेरी मिट्टी मेरा देश या अभियानामधील अमृत वाटीका उपक्रमांतर्गत गावातील मातीचे कलश भरुन पंचायत समितीत पाठवण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर सर यांनी केले. Residents of Velaneshwar honored the soldiers

या सर्व कार्यक्रमांना सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य नितीन पोळेकर, विलास घाणेकर, संपदा केळकर, सुप्रिया आरवलकर, ॲड. अमृता मोरे,  सौ. नाटेकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विश्वजीत जामसुतकर, माजी सरपंच संदीप ठाकुर, ग्रामविकास अधिकारी प्रियांका जाधव, पत्रकार उमेश शिंदे, मुख्याध्यापक सतिष नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, मंदार कानडे, उपशिक्षिका अश्विनी धुमाळ, उपशिक्षक उमेश नाटेकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे, भारती  गोवेकर, आकांक्षा खरे, विश्वजीत जासुतकर, शशिकांत इतापे, विनायक कांबळे, सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस आरोग्य सेविका व मान्यवर ग्रामस्थ बंधु भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते. Residents of Velaneshwar honored the soldiers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarResidents of Velaneshwar honored the soldiersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.