आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान
गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित केली होती. नुकताच या परिषदेचा समारोप झाला. “” विकसित भारत-नवीन भारत “”ही शिखर परिषदेची थीम होती. या वर्षी संशोधन पेपर फेरफार व संशोधन प्रकल्प नवनिर्माण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. थीम कृषी व एलाईड विद्यापीठाची विद्यार्थिनी व गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे सुकन्या कु ऐश्वर्या अरूण विचारे हिला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचे शीर्षक Agri Export Digital Dashboard असे होते. Research Paper Award to Aishwarya
कु. ऐश्वर्या अरूण विचारे ही गुहागर तालुक्यातील वरवेली गावची सुकन्या असून तिने बारावी सायन्स नंतर कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते – दहिवली – कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर शरद पवार कृषी फेलोशिप अंतर्गत नवीनता आणि संशोधन मध्ये पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. ती इस्रोमध्ये (ISRO)राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली. Basics of satellite meteorology and climate change and agricultural monitoring या session साठी जिची निवड झाली. Research Paper Award to Aishwarya
कृषी क्षेत्रामधून संपुर्ण भारतामधून ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तिने प्राप्त केलेला पुरस्कारामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदमध्ये कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार – यामध्ये शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानपुर्वक नावीन्यपूर्ण साधन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामधून आंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्ये शेतकरी स्वतः सहजरित्या देवाण करू शकतात. तसेच स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्लेषण आणि बाजारपेठ सर्वेक्षण करू शकतात . येत्या काळात या संशोधनावर पेटंट मिळवण्याचा तिचा प्रयत्न सुरू असेल असे तिने सांगितले.
सध्या पुढील पदवी – गुजरात मधून M.SC. Agri analytics ( कृषी विश्लेषण) मध्ये घेत आहे. Research Paper Award to Aishwarya