• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर समुद्रात बुडणाऱ्या दोघांना जीव रक्षकांनी वाचविले

by Ganesh Dhanawade
August 17, 2026
in Guhagar
141 1
0
Rescued drowning in the sea at Guhagar

बुढणाऱ्या तरुणांसोबत जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर

277
SHARES
791
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी वाचवल्याची घटना शनिवारी  घडली. तांडेल व निहाल तोडणकर यांना अन्य तरुणांनी सहकार्य केले. या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचल्याबद्दल किनाऱ्यावरील सर्वांनी जीव रक्षकांचे कौतुक केले. Rescued drowning in the sea at Guhagar

गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी लावतात. शनिवार रविवारी सुट्टी असल्याने गुहागरात पर्यटकांचा ओघ जास्त असतो.  Rescued drowning in the sea at Guhagar

शनिवारी चिपळूण येथील गफार भट व झारखंड येथील हिरालाल करमळी हे दोघे आपल्या अन्य सहा मित्रांसोबत गुहागर फिरायला आले होते. गुहागर पोलीस स्थानकाच्या मागील समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. गफार व हिरालाल या दोघांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोन पुरुष खोल पाण्यात बुडू लागले. आपले मित्र बुडत आहेत, हे कळताच त्याच्या सहकार्यांनी आरडाओरोड केली. याचवेळी किनाऱ्यावरील नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी क्षणाचाही विलंब न घालवता रेस्क्यू बोर्ड घेऊन समुद्रात गेले. या दोघांनीही काही क्षणात बुढणाऱ्या दोघांना किनाऱ्यावर आणले.  बुढणाऱ्यांनी प्रदेश व निहालचे बाहेर आल्यावर आभार मानले. Rescued drowning in the sea at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsNews in GuhagarRescued drowning in the sea at Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet69
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.