गुहागर तहसील कार्यालयाचे देखणे नियोजन; वाहनांचे आकर्षक संचलन
गुहागर, ता. 26 : येथील पोलिस परेड मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी प्रथमच तहसीलदार सौ. वराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या विविधांगी देशभक्तीपर नृत्यांच्या कार्यक्रम सर्वांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. Republic Day at Guhagar Police Ground

पोलीस परेड मैदानावर सकाळी ९.१५ वाजता शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस कर्मचारी व गुहागर हायस्कूलचे महाराष्ट्र छात्र सेनेचे विद्यार्थी यांनी संचालन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मानवंदना दिली. त्यानंतर पोलीस वाहन, नगरपंचायत, गटविकास अधिकारी, तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स वाहनांचे संचलन पार पडले. Republic Day at Guhagar Police Ground

या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुहागर हायस्कूलने साहित्य कवायत, हाताचे कवायत प्रकार, अंजनवेल हायस्कूलचे झांज पथक, बालभारती पब्लिक स्कूलचे पथनाट्य, जीवन शिक्षण शाळा नं. १ चे देशभक्तीपर नृत्य, जुनिअर कॉलेज गुहागर यांचे समूहनृत्य सादर केले. Republic Day at Guhagar Police Ground

तालुक्यात विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी व वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी यश संपादन केले अशा इस्रो व नासासाठी निवड झालेली गुहागर तालुक्यातील काजूर्ली शाळा नं. २ ची विद्यार्थिनी सोनल डींगणकर, कोंड शृंगारी उर्दुची मुस्तफा शेख, वेलंब शाळा नं. ची क्षितिजा मोरे, जुदो खेळाडू श्रद्धा चालके, रचिता सुर्वे, एनसीसी विद्यार्थी चारुता आठवले, मनस्वी जाधव, श्रीया जावळे, दीप्ती घाडी, श्रेयस गावडे, अदिती गावडे, आदर्श घाडगे आदींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. Republic Day at Guhagar Police Ground

अपंग पुनर्वसन संस्थेचे उदय रावणंग, क्रीडा शिक्षिका सोनाली हळदणकर, गुलाबसिंग पाडवी, क्रीडा शिक्षक वैभव ढोणे, सैनिक संदीप घार्गे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर आदींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी गुहागर नगरपंचायत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यानाही यावेळी गौरविण्यात आले. Republic Day at Guhagar Police Ground

गौरव कार्यक्रमानंतर पुन्हा गुहागर हायस्कूल यांचे तेरी मिट्टी मे, सलाम इंडिया नृत्य, झाडे वाचवा पथनाट्य, देशभक्तीपर रिमिक्स गीत, गुहागर ज्युडो संघटनेच्या विद्यार्थ्यांनी तायकाँदो प्रात्यक्षिके सादर केली. शेवटी तहसीलदार वराळे यांनी सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Republic Day at Guhagar Police Ground

या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, गटविकास अधिकारी श्री. राऊत, नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष प्रणिता साटले, आरोग्य सभापती सौ. स्नेहल रेवाले, बांधकाम सभापती वैशाली मालप, नगरसेविका मनाली सांगळे, भाग्यलक्ष्मी सौ. कानडे, नगरसेवक अमोल गोयथळे, समीर घाणेकर, उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, माधव साटले, आगार व्यवस्थापक वैभव कांबळे, अडव्होकेट संकेत साळवी, नगरपंचायतीचे श्री. पेढांबकर, तालुका समादेशक सुधाकर कांबळे, निलेश गोयथळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू आदिंसह सर्व विभागाचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. Republic Day at Guhagar Police Ground



