गुहागर, ता. 27 : ग्रामपंचायत वेलदूर येथे प्रजासत्ताक दिन सलोनी पालशेतकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सरपंच दिव्या ताई वनकर यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाला प्रेरणा मिळावी म्हणून नाविन्यपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेत ध्वजारोहन करण्याचा आपला बहुमान सलोनी पालशेतकर या विद्यार्थिनीला दिला. Republic Day at Gram Panchayat Veldur


सलोनी पालशेतकर ही नवानगर शाळेतील अष्टपैलू विद्यार्थिनी तसेच एकलव्य पुरस्कार विद्यार्थिनी आहे. तिने स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळवून देण्यामध्ये स्वच्छता मॉनिटर म्हणून काम केले. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रंगभरण स्पर्धा यामध्ये चौफेर कामगिरी करणारी विद्यार्थिनी कुमारी सलोनी सुदर्शन पालशेतकर इयत्ता सातवी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वेलदूर नंबर एक वेलदूर उर्दू वेलदूर नवानगर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. एकलव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुमारी सलोनी पालशेतकर हिचा ग्रामपंचायत वेलदूर तर्फे सरपंच दिव्याताई वनकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. Republic Day at Gram Panchayat Veldur


सरपंच दिव्याताई वनकर यांनी त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपला गाव सर्वांगीण व परिपूर्ण विकासाच्या क्षेत्रात प्रगतीमध्ये अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती स्मिताताई धामणस्कर, मा. उपसभापती विठ्ठल भालेकर, सरपंच दिव्याताई वनकर, उपसरपंच राजू शेठ जावळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर, पोलीस पाटील श्री वायंगणकर, ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कृषी व आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ, विविध मंडळाचे अध्यक्ष, युवा वर्ग, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक गणेश विचारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी कुळे यांनी केले. Republic Day at Gram Panchayat Veldur