रत्नागिरी, ता. 20 : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २०६ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरत आहेत. धोकादायक ठरणाऱ्या शाळा इमारतींच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा इमारती लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहेत. Repair of school buildings in the district


जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सुमारे २६७ शाळा धोकादायक बनल्या आहेत. त्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. अशा शाळांमध्ये आपली मुले कशी पाठवावी, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. Repair of school buildings in the district
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजनमधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तालुक्यातील मंडणगड ०४, दापोली २१, खेड ६३, चिपळूण २५, गुहागर १२, संगमेश्वर २८, रत्नागिरी १९, लांजा ०८, राजापूर २६ शाळा दुरुस्तीसाठी मंजूर झाल्या आहेत. तर ६१ शाळांच्या नादुरुस्त इमारतींसाठीही निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. Repair of school buildings in the district