गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन
गुहागर, ता. 10 : बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना निवेदन देण्यात आले. Relieve primary teachers from BLO work
या निवेदनात म्हटले आहे की, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघाअंतर्गत बीएलओ म्हणून मतदार यादीच्या कामासाठी जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना नियुक्त केले आहे. परंतु, सदर काम शिक्षकांना संदर्भ क्रमांक ०१ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नेमणूक देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर परिणाम होत आहे. संदर्भ क्रमांक ०२ अन्वये शिक्षकांना देण्यात येणा-या अशैक्षणिक कामामुळे विदयार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे म्हणून शिक्षक, संघटना, पदाधिकारी, पालक यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देवू नये, अशी सतत मागणी करण्यात येत होती. Relieve primary teachers from BLO work
सदर मागणीच्या अनुषंगाने सदर कामाच्या चौकशीसाठी शासनाकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने सदर बाबींचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल दिला आहे. संदर्भ क्रमांक ०२ मध्ये समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे तीन भागात वर्गीकरण दिले आहे. त्यामधील परिशिष्ठ व (शैक्षणिक कामे) मधील मुददा क्रमांक ०२ मध्ये प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या कामा व्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे हे अशैक्षणिक काम आहे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीएलओचे काम अशैक्षणिक काम असल्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून सदर कामातून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. अशी विनंती करण्यात आली आहे. Relieve primary teachers from BLO work
या निवेदनावर गुहागर तालुका प्राथमिक शिक्षण संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अरविंद पालकर, कैलास शार्दुल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष रवींद्र कुळ्ये, सचिव सतीश मुणगेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, सचिव समीर पावसकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष अमोल धुमाळ, सचिव प्रभू हंबर्डे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग शिक्षक कर्मचारी संघटना अध्यक्ष दशरथ कदम, काष्ट्राइब शिक्षक संघटना अध्यक्ष सुहास गायकवाड आदी उपस्थित होते. Relieve primary teachers from BLO work