• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिक्षणाधिकारी यांच्या मान्यतेने शालेय कर्मचाऱ्यांना दिलासा

by Manoj Bavdhankar
December 21, 2023
in Ratnagiri
99 1
0
Relief to school staff with approval of Education Officer
194
SHARES
555
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे गट करून प्रशासकीय कामकाज व शिक्षक समस्या सोडविणार

रत्नागिरी, ता. 21 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांचे प्रयत्नाने जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे गट करून त्यासाठी अनुक्रमे खेड, चिपळूण व राजापूर येथे प्रत्येक महिन्यातील एक दिवस शालेय प्रशासकीय कामकाजासाठी व शिक्षक समस्या सोडवण्यासाठी देण्याचे माननीय शिक्षणाधिकारी सौ सावंत मॅडम यांनी दिनांक 19/ 12 /2023 रोजी मान्य केले. Relief to school staff with approval of Education Officer

ही अध्यापक संघाची ही जुनी मागणी होती. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व मा. नगराध्यक्ष श्री .वैभवजी खेडेकर यांनी जातीने लक्ष घालून ही मागणी मान्य करून घेतली. रत्नागिरी येथे शिक्षणाधिकारी कार्यालय मुख्यालयात वारंवार जाण्यास होणारा त्रास व त्यासाठीचा आर्थिक भुर्दंड, त्यासाठीची रजा, यापासून शालेय कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. Relief to school staff with approval of Education Officer

शिक्षणाधिकारी सौ. सावंत मॅडम यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यासंबंधीच्या तारखा जाहीर करणार असल्याचे सांगितले व प्रत्येक तालुक्यात पोहोचण्याचा व शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा मानस व्यक्त केला. शालेय कर्मचाऱ्याची वरिष्ठ वेतन श्रेणी प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित बिले व अडचणी यासंबंधी सविस्तर चर्चा होऊन त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे मा. शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले. Relief to school staff with approval of Education Officer

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRelief to school staff with approval of Education OfficerUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.