गुहागर, ता. 08 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल मँनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी व प्रा. शैलेश घाणेकर, प्रा. वृणाल बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली असगोली येथील अत्याधुनिक वूड्स रिसोर्टला प्रत्यक्ष भेट दिली. वूड्स रिसोर्टचे शेफ श्री. अमेय कानिटकर यांनी संपूर्ण रिसेप्शन एरिया तसेच टेरिफ कार्डची माहिती दिली. Regal College’s visit to Woods Resort

यावेळी रिसोर्टच्या हाउस कीपिंग स्टाफने हॉटेल मधील रूम्स मधील सप्लाय एमिनिटीजची विस्तृत माहिती दिली. यामुळे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट रूम्स, रिसेप्शन, हॉल, स्विमिंगपूल, रेस्टॉरंट इ. सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव व ज्ञान त्यांना घेता आले. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्याना रिसेप्शन काउंटरवर चेक इन आणि चेक आउट कसे चालते, रूमचे रेट किती आहेत याची संपूर्ण माहिती मिळाली. तसेच किचनमध्ये कोणकोणते इक्यूपमेंट कोणत्या कामासाठी वापरले जातात याची माहिती मिळाली. या क्षेत्राभेटीमध्ये वूड्स रिसोर्टचे हेडशेफ श्री. एकनाथ धुरी यांनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची माहिती दिली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि क्षेत्रभेट पार पडली. Regal College’s visit to Woods Resort

