गुहागर, ता. 03 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये (Regal College Shringartali) येथे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘नर्सिंग केअर’ विभागाचा निकाल १०० % जाहीर झाला आहे. या कोर्ससाठी एकूण २० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ७ मुलींना फर्स्टक्लास विथ डिस्टींक्शन मिळाले असून उर्वरित मुलींना फर्स्टक्लास मिळाला आहे. Regal College Nursing Care Department 100% Result

रिगल कॉलेजमधील नर्सिंग विभागामधील विद्यार्थिनींनी त्यांचे 3 महिन्यांचे ट्रेनिंग मुंबई, पुणे येथील नामांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधून पूर्ण केले आहे व त्या मुंबई ,पुणे, रत्नागिरी येथील नामांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थिनींचे रिगल एज्युकेशन सोसायटी व रिगल कॉलेज शृंगारतळी कडून अभिनंदन करण्यात आले. Regal College Nursing Care Department 100% Result
या सर्व विद्यार्थिनिंना रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या नर्सिंग विभागाच्या विभागप्रमुख सौ.तनुजा अडूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘नर्सिंग केअर’ हा एक वर्षाचा 10 वी पास पात्रता असलेला व कमी कालावधीमध्ये हमखास नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा कोर्स सुरु आहे. तरी या मर्यादित जागा असलेल्या कोर्ससाठी विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आपला प्रवेश नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal College Nursing Care Department 100% Result

