गुहागर, ता. 21 : सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच विविध क्रीडा स्पर्धां संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक श्री. निलेश गोयथळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव वेल्हाळ, नासिम साल्हे उपस्थित होते. Regal College held sports competitions
यावेळी विद्यार्थ्यांनी व सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून देशाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. निलेश गोयथळे यांनी खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व , व त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक फायद्यांबद्दल पटवून दिले. गौरव वेल्हाळ यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेमध्ये मुलांसाठी क्रिकेट, खो-खो, व्हाँलीबाँल, डॉजबाँल, रनिंग, कबड्डी अशा विविध मैदानी खेळांचा समावेश होता. Regal College held sports competitions
कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक रिगल थंडर्स, डॉजबाँलमध्ये प्रथम क्रमांक रिगल फ्लायिंग गर्ल्स, खो-खो (मुली) – प्रथम क्रमांक रिगल रिबेल, खो-खो (मुलगे) – प्रथम क्रमांक रिगल चालेन्जर्स, क्रिकेट (मुलगे) – प्रथम क्रमांक रिगल चाम्पियन, क्रिकेट (मुली) – प्रथम क्रमांक रिगल स्मार्ट गर्ल्स यांनी पटकाविला. बेस्ट बॅटसमन (मुलगे) – कु. आदित्य झगडे, बेस्ट बॅटसमन (मुली) – कु. जान्हवी गोयथळे, बेस्ट बॉलर (मुलगे) – कु. सर्वेश रांजाणे यांची निवड करण्यात आली. तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये रनिंग (मुली) – प्रथम क्रमांक कु. वेदिका वाडावे व रनिंग (मुलगे) – प्रथम क्रमांक कु. रितेश लांजेकर यांना मिळाला. बेस्ट प्लेयर (मुलगे) – कु. हर्ष भुवड, बेस्ट प्लेयर (मुली) – कु. वेदिका वाडावे यांना मिळाला. Regal College held sports competitions
विजेत्यांना रिगल सन्मानचिन्ह, प्रशिस्तीपत्रक व मेडल देऊन गौरवण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हि क्रीडा स्पर्धा पार पडली. या क्रीडा स्पर्धेचे नियोजन रिगल कॉलेज शृंगारतळीचे क्रीडाप्रमुख प्रा. श्री. वृणाल बेर्डे, विद्यार्थी क्रीडाप्रमुख कु. आदित्य झगडे व रिगलचे सर्व सहकारी प्राध्यापक यांनी केले. तसेच रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाली. Regal College held sports competitions