कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध
गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. तसेच हा कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम मध्ये उपलब्ध असून चार सेमिस्टरचा अभ्यासक्रम आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी रिगल कॉलेज शृंगारतळी तौहीद माँल, गुहागर रोड, शृंगारतळी. मोबाईल नं. ७०६६०३४२००/ ७८७५८४३००६ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. Regal College admission process starts

या अभ्यासक्रमात शासन, समाज व स्थानिक प्रशासन या संबंधीचे सखोल ज्ञान, केंद्र शासन व राज्य शासनामधील प्रशासकीय रचनेचा अभ्यास तसेच आर्थिक नियोजन व व्यवस्थापन, तुलनात्मक लोकप्रशासन, भारतीय व्यवस्थापन या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी, प्रशासकीय सेवा, प्रशासकीय कायदेशीर सल्लागार, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापक, मार्केटिंग मॅनेजर, एच.आर. मॅनेजर, शिक्षक, कामगार व्यवस्थापन संबंध विशेष, व्यवस्थापन विश्लेषक, सीमाशुल्क निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. तसेच प्राध्यापक, संशोधक म्हणूनही संधी आहेत. Regal College admission process starts

तसेच रिगल कॉलेज शृंगारतळी येथे BSc (HS) १००% नोकरीचा हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु आहे. तसेच विविध कोर्सना विशेषतः एम.ए. (पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), नर्सिंग केयर, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, बी.ए-संस्कृत (विशारद), फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन, कॉम्पुटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नीशियन(DMLT) आणि BCA (मुला-मुलींसाठी) या कोर्सची प्रवेश प्रक्रिया चालू असून या व्यावसायिक कोर्सचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्यावी. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के, रिगल कॉलेजच्या प्राचार्या. सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal College admission process starts
