• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खालचापाट येथील स्पीड बेकरवर रिफ्लेक्टर लावावेत

by Manoj Bavdhankar
June 10, 2023
in Guhagar
87 0
0
Reflectors should be placed on speed bakers
170
SHARES
486
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

गुहागर, ता. 10 : खालचापाट येथील दोन स्पीड बेकर वर लवकरात लवकर रिफ्लेक्टर लावण्यात यावे अशी मागणी गुहागर वासियांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. Reflectors should be placed on speed bakers

खालचापाट येथे आरेकर यांचे घरासमोर व असगोली रोडला विखारे यांचे घरासमोर स्पीड बेकर असून त्याच्यावर पांढरे पट्टे अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत.  यामुळे वाहन चालकांना हे स्पीड बेकर दिसण्यात येत नाहीत. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. स्पीड बेकर दिसत नसल्यामुळे अचानक समोर स्पीड ब्रेकर आल्यामुळे मोठ्या गाड्या जोरात आपटणे अथवा लहान गाड्या मोटरसायकल स्वार अनेक वेळा पडताना दिसत आहेत.  तरी या स्पीड बेकर वर लवकरात लवकर पांढरे पट्टे अथवा रिफ्लेक्टर लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Reflectors should be placed on speed bakers

खालचा पाट मराठी शाळेजवळ सुद्धा अशाच प्रकारचा स्पीड बेकर होता. परंतु त्या स्पीडबेकरवर दोन दिवसांपूर्वी स्पीड बेकरची उंची कमी करून तेथे रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत. यामुळे तिथे स्पीड बेकर आता दिसण्यात येत आहे. तेथील स्पीड बेकर वर रिफ्लेक्टर लावल्यावर आता याही दोन स्पीड बेकर वर रिफ्लेक्टर लावतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु ते न लावल्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिफ्लेक्टर लावण्याची मागणी केली आहे. Reflectors should be placed on speed bakers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarReflectors should be placed on speed bakersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजस्पीड बेकर
Share68SendTweet43
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.