• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी २८ ला भरती प्रक्रिया

by Guhagar News
March 24, 2023
in Ratnagiri
75 1
0
Recruitment process for ITI pass candidates
147
SHARES
421
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता 24 : आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रत्नागिरीत २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती पुणे येथील ऑटोमोबाईल क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीत होणार आहे. Recruitment process for ITI pass candidates

सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी गट नं. २०७, प्लॉट नं. ६, ७ व ८, शिंदेवाडी, (ता. भोर, जि. पुणे) येथे आहे. या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर या पदासाठी १५० जागांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी आयटीआय ट्रेडमधील टर्नर, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मिलर, ड्रिलर, मॅकेनिकल, मशिन टूल्स मेंटेनन्स (MMTM), डिप्लोमा मॅकेनिकल आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. Recruitment process for ITI pass candidates

सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी १९९२ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल १७० कोटी असून कंपनीने पुढील विस्तार योजना आखली आहे. त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे, अशी माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) राजीव पाध्ये यांनी सांगितली. राजीव पाध्ये हे मूळचे धामणी, संगमेश्वरचे असून गेले १० वर्षे या कंपनीचा वित्त कारभार सांभाळतात. Recruitment process for ITI pass candidates

कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी श्री. पाध्ये, रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर यांनी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे यांच्याशी समक्ष चर्चा करून रोजगार मेळावा आयोजित केला. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वरील उल्लेख केलेल्या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततर्फे करण्यात आले आहे. Recruitment process for ITI pass candidates

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRecruitment process for ITI pass candidatesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.