रत्नागिरी, ता. 09 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे 12 जून 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. Recruitment fair at ITI Ratnagiri
या भरती मेळाव्यासाठी इयत्ता पाचवी, दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारानी सदर मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां), मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा- औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. Recruitment fair at ITI Ratnagiri