• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथील टेहळणी मनोऱ्याची परस्पर विक्री

by Ganesh Dhanawade
September 16, 2023
in Guhagar
129 1
1
Reciprocal sale of watch tower at Velneshwar
253
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर सरपंचांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

गुहागर, ता. 16 : पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळणेश्वर समुद्रकिनारी वादळाने जमीनदोस्त झालेल्या टेहळणी मनोऱ्याची लिलाव प्रक्रिया न करताच त्याची परस्पर विक्री करण्यात आली. त्याची नाममात्र, रक्कम बऱ्याच महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी भरणा केल्याची तक्रार ग्रामस्थ सुरेंद्र हरिश्चंद्र घाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे. Reciprocal sale of watch tower at Velneshwar

तालुक्यातील वेळणेश्वर- वाडदई ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराविरोधात सुरेंद्र घाग यांनी टेहळणी मनोऱ्याच्या परस्पर विक्रीविषयी माहिती अधिकारात माहिती मागविली. त्यातून याबाबत बऱ्याच गोष्टी त्यांनी उजेडात आणल्या आहेत. कोकण विकास पर्यटनामार्फत वेळणेश्वर समुद्रकिनारी बसविलेला टेहळणी मनोरा ४ जून २०२० रोजीच्या वादळामध्ये जमीनदोस्त झाला होता. त्या टेहळणी मनोऱ्याचे वजन १५९१ किलो होते. सदर टेहळणी मनोऱ्याची विल्हेवाट लावणे व लिलाव करण्याचे दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठरले होते. Reciprocal sale of watch tower at Velneshwar

या बाबतीत दि. १६ मार्च २०२१ रोजी गटविकास अधिकारी व तहसिलदार गुहागर यांना कळविले होते. परंतु त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार केला गेला नाही. टेहळणी मनोरा विक्रीबाबत शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया पार पाडली गेली नाही. माहिती अधिकारात असे आढळून आले आहे की, टेहळणी मनोरा मागील दीड वर्षापूर्वी शासनाची कोणतीही परवानगी न घेता विक्री केला गेला आहे. त्यावेळी त्याचे वजन अंदाजे ४०० किलो दाखविले गेले. विक्री करुन आलेली रक्कम दि. २१ आँगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायतीमध्ये जमा केली गेली नव्हती. ग्रामपंचायतीच्या नियमानुसार, ग्रा.पं. मालकीची कोणतीही वस्तू विकली असता विक्री रक्कम ग्रा.पं.मध्ये ७ दिवसाच्या आत भरणे आवश्यक असते. मात्र, ही रक्कम सरपंच यांनी उशिरा भरल्याने हा एकप्रकारचा गैरव्यवहार असून याची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुरेंद्र घाग यांनी केली आहे. Reciprocal sale of watch tower at Velneshwar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarReciprocal sale of watch tower at VelneshwarUpdates of Guhagarwatch towerगुहागर मराठी बातम्याटेहळणी मनोराटॉप न्युजताज्या बातम्यापर्यटन स्थळमराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.