गुहागर, ता. 19: गुहागर येथे ज्ञानरश्मी वाचनालयात भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त ज्ञानरश्मी वाचनप्रेरणा दिन व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. Reading Motivation Day at Gyanarashmi Library
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अरुण इंगवले व प्रा. संतोष गोणबरे सर उपस्थित होते. यावेळी ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेन्द्र आरेकर यांनी रतनजी टाटा यांच्या विषयी माहिती सांगितली. टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या ग्रंथालय उपक्रम सन 2024-25 पुस्तक निर्मिती योजनेत रत्नागिरी जिल्हा स्तरावर पुस्तकांची निवड झालेल्या मनाली मनोज बावधनकर, राष्ट्रपाल सावंत, रविंद्र गुरव यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाल कवी गार्गी क्षिरसागर, रेईषा चौगुले यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या तसेच कु. विभा मालप हिने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची माहिती सांगितली. Reading Motivation Day at Gyanarashmi Library
मनाली बावधनकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच ईश्र्वरचंद्र हलगरे, राष्ट्रपाल सावंत, ज्ञानेश्वर झगडे, रविंद्र गुरव सर यांनी आपल्या कविता सादर केल्या. इंगवले सर व गोणबरे सर यांनी बाल कविंना मार्गदर्शन केले. वाचनालयाचे जेष्ठ उत्कृष्ट वाचक श्री गोपीनाथ वेल्हाळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय गुरव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ईश्र्वरचंद्र हलगरे व ज्ञानेश्वर झगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी वाचनालयाचे संचालक, कर्मचारी वृंद, वाचक, सभासद उपस्थित होते. Reading Motivation Day at Gyanarashmi Library