गुहागर, ता. 25 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याबद्द्ल महाराष्ट्र राज्य पेंशन संघटना सेवा समिती गुहागरचे वतीने अध्यक्ष श्री. डि पी गुरव यांचे मार्फत शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. महिला बचतगट, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, निसर्ग चक्रीवादळ महापुर अशा नैसर्गिक आपत्तीत केलेले कार्य, पायाभुत सुविधांचा विकास, शेतीमधील प्रयोगांना प्रोत्साहन, विविधांगी कामात प्रशांत राऊत यांनी आपला ठसा उमटविला आहे. Raut felicitated by Pension Organization Service Committee

जून 2022 मध्ये गुहागर तालुक्यात प्रशांत राऊत गटविकास अधिकारी म्हणून बदली होवून आले तेव्हा बचत गटांना बँकांकडून मिळणारे आर्थिक साह्य (बँक लिंकेज) केवळ 7 कोटी रुपये होते. राऊत यांनी महिला बचत गटांबरोबर संवाद साधुन त्यांना अधिक कार्यान्वित करण्याचे धोरण आखले. बँकेकडून 22 कोटीचे आर्थिक साह्य उपलब्ध करुन दिले. बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीदार मिळावेत म्हणून तहसील प्रशासनाला सोबत घेत गुहागरमध्ये बचत गटांचा मेळावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळावे म्हणून गटशिक्षणाधिकारी लिना भागवत यांना सोबत घेत मिशन शिष्यवृत्ती उपक्रम सुरु केला. या उपक्रमामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या 13 झाली. पुढील वर्षी 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. गुहागर तालुक्यात केवळ एक महिला बचतगट गांडुळखताची निर्मिती करत होता. Raut felicitated by Pension Organization Service Committee

तालुक्यातच गांडुळखताची मागणी जास्त असल्याने प्रशांत राऊत यांनी कौंढर काळसुर आणि खामशेत येथील महिला बचत गटांना गांडुळखत निर्मिती प्रकल्पासाठी प्रोत्साहन दिले. आज हे दोन्ही बचतगट गांडुळखताचे टनावारी उत्पन्न घेत आहेत. हळद लागवडीला प्रोत्साहन म्हणून सलग दोन वर्ष स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती कृषी विभागातर्फे केले जात आहे. याशिवाय गुहागर पंचायत समितीमध्ये स्वच्छता गृह, रंगरंगोटी, विविध विभागांना संगणक देणे अशा पायाभुत सुविधा देण्याचे कामही त्यांनी केले आहे. Raut felicitated by Pension Organization Service Committee

यावेळी संघटनेचे पदाधिकारी, राज्य कोषाध्यक्ष श्री. विश्वनाथ बेलवलकर ता. कार्याध्यक्ष श्री. विश्वास बेलवलकर जि. कोषाध्यक्ष श्री. उकारडे सेक्रेटरी श्री. बेंडल, श्री. जाधव, श्री. कानडे उपाध्यक्ष श्री. राय जाधव उपस्थित होते. Raut felicitated by Pension Organization Service Committee
