गुरु शिष्य परंपराच भारतीय संस्कृतीचा आधार ; डॉ. दिनकर मराठे
रत्नागिरी, ता.06 : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन म्हणजे आपल्या जवळील ज्ञान भांडार खुले करत निरपेक्षपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे अशा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. Ratnagiri Teacher’s Day Celebration


शिक्षक दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी उपकेंद्रामध्ये संचालक डॉ. दिनकर मराठे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी डॉ. मराठे म्हणाले की, भारताचे दुसरे राष्ट्रपती, भारतरत्न पुरस्काराचे मानकरी राधाकृष्णन् हे थोर वेदांती पंडित, गाढे तत्त्ववेत्ते, उत्तम लेखक, उत्तम प्रशासक अशा अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे ते आदर्श शिक्षक होते. अशा या बहुआयामी महान व्यक्तीमत्त्व लाभलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ तामिळनाडू राज्यात चित्तूर प्रांतात तिरुत्ताणी या गावात झाला. महाविद्यालयीन स्तरावर काही वर्षे अध्यापनाचे कार्य करून ते अखिल विश्वाचे शिक्षक बनले. भारतीय शिक्षण क्षेत्रात त्यांनी अत्यंत भरीव असे योगदान देत शिक्षक कसा असावा याचा एक आदर्श जगासमोर घालून दिला. Ratnagiri Teacher’s Day Celebration


सुशिक्षित समाज आणि उत्तम व्यक्तित्व निर्मितीकरिता शिक्षक हाच आधारस्तंभ असतो. भारतीय ज्ञानपरंपरेत गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्त्व असून पाश्चात्य आक्रमणे होऊनही जी समृद्ध भारतीय संस्कृती अखंडितपणे टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरु- शिष्य परंपरा होय, असे विचार डॉ. दिनकर मराठे यांनी मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील शिक्षक जयंत अभ्यंकर, स्नेहा शिवलकर आदि मंडळी उपस्थित होती. Ratnagiri Teacher’s Day Celebration
यावेळी संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना श्री. जयंत अभ्यंकर म्हणाले की, आदर्श शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच आम्ही घडलो. जीवनात पुस्तकी विद्येबरोबरच व्यावहारिक शहाणपणही शिक्षकांच्या सहवासात राहिल्याने आणि त्यांच्या वर्तणुकीतून शिकायला मिळते. Ratnagiri Teacher’s Day Celebration


कु. स्नेहा शिवलकर म्हणाल्या की, आपल्या गुरुंचे स्मरण करत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे अमूल्य स्थान असते. अगदी शालेय जीवनापासून ते आजपर्यंत मला जे जे शिक्षक लाभले त्यांच्या मार्गदर्शनानेच माझ्या जीवनाला आकार प्राप्त झाला. Ratnagiri Teacher’s Day Celebration
या कार्ययक्रमाचे सूत्रसंचालन कश्मिरा दळी यांनी केले. कार्यक्रमासाठी उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Ratnagiri Teacher’s Day Celebration