दि. २३ रोजी सकाळी १० वा. शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे
गुहागर, ता. 22 : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे येथे घेण्यात येईल. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या कार्यक्रमासाठी सकाळी वेळेवर उपस्थित राहावे. Ratnagiri taluka workers meeting and training

या कार्यशाळेत माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १ ते ३१ कलमांचे संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरशेनचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.श्री. सुभाषजी बसवेकर देणार आहेत. Ratnagiri taluka workers meeting and training
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी तसेच या कार्यक्षेत्रात कार्य करीत असलेले युवक – युवती सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे श्री समीर शिरवाडकर (सचिव महाराष्ट्र), श्री सुशांत मराठे (जिल्हाध्यक्ष), श्री रमजान गोलंदाज (कार्याध्यक्ष), श्री पद्मनाभ कोठारकर (जिल्हा सचिव), राज बोथरे (जिल्हा ऊपाध्यक्ष), श्री मनोहर गुरव (अध्यक्ष, संगमेश्वर तालुका), आणि स्वाती हडकर (महिला अध्यक्षा, चिपळूण तालूका), सौ सुहासिनी पांचाळ (महिला विभाग संगमेश्वर तालुका), कार्याध्यक्ष संगमेश्वर तालुका शेखर जोगळे इत्यादीने केले आहे. Ratnagiri taluka workers meeting and training
