• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत छात्र मित्र मेळावा

by Guhagar News
December 12, 2023
in Ratnagiri
79 1
0
Ratnagiri student friends meeting
156
SHARES
445
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सर्वोदय छात्रालयास मदतीचे आवाहन; हरिश्चंद्र गीते

रत्नागिरी, ता. 12 : सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयास शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प सोडलेला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी आज येथे केले. Ratnagiri student friends meeting

छात्रालयाच्या १९ व्या छात्र मित्र मेळाव्यात ते बोलत होते. दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा रविवार रंगला. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, व्यवस्था समिती सदस्य बीना कळंबटे, रघुवीर शेलार, प्रमुख पाहुणे रमेश भाटकर, सर्वोदय पुरस्कार विजेते शिवराम जाधव उपस्थित होते. Ratnagiri student friends meeting

Ratnagiri student friends meeting

श्रीमती यमुनाबाई खेर, पद्मविभूषण बाळासाहेब खेर आणि कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. अॅड. ढवळ यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक हे आपलेपणाच्या भावनेने जोडले जावेत या हेतूने २००४ पासून छात्रमित्र मेळावा आयोजित करत आहोत. रत्नागिरीसह गोपुरी आश्रम, मणीभवन मुंबई, लांजा, चिपळूण येथेही मेळावे घेतले आहेत.

प्रास्ताविकामध्ये रघुवीर शेलार यांनी सांगितले की, आजचा छात्र मित्र मेळावा आयुष्याच्या शिदोरीत भर घालणारा आहे. सर्वोदय छात्रालयाचे आतापर्यंत एक हजार माजी विद्यार्थी आहेत. छात्रालयाला ७५ वर्षे होत आहेत. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी संस्थेकरिता ५ टक्के योगदान द्यावे. २८ एप्रिलला मोठा कार्यक्रम होणार आहे. दयानंद परवडी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा जयश्री बर्वे यांनी केले. शिवप्रकाश चौघुले यांनी आभार मानले. Ratnagiri student friends meeting

माजी विद्यार्थी तथा जलसंपदा विभागातील वरिष्ठ लिपीक जयदीप कांबळे यांनी सांगितले की, मला छात्रालयात फक्त १०० रुपयांत प्रवेश मिळाला पण १०० कोटींपेक्षा जास्त संस्कार येथे मिळाले. माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. त्यांच्याप्रमाणेच अन्य बहुतांशी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून छात्रालयाचे व हरिश्चंद्र गीते यांचे आभार मानले. अनेक माजी विद्यार्थी गहिवरून आपल्या आठवणी सांगत होते. ८४ वर्षीय बाबाजी गिडये यांनीही मनोगतात छात्रालयाचे अनंत उपकार असल्याचे सांगितले. मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे यांनी मनोगत व्यक्त केले. Ratnagiri student friends meeting

सुभाषित नवनीतचे प्रकाशन

हरिश्चंद्र गीते यांनी संपादित केलेल्या सुभाषित नवनीत या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी बीना कळंबटे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृत साहित्यामध्ये सुभाषितांचे विशेष स्थान आहे. सुभाषितात चांगली व उपयुक्त मार्गदर्शक रचना केलेली असते त्यामुळे त्याचे संकलन केल्याचे श्री. गीते यांनी सांगितले. Ratnagiri student friends meeting

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRatnagiri student friends meetingUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.