रत्नागिरी, ता. 28 : शाळा, संस्थांना शैक्षणिक उठावाअंतर्गत मदत देणाऱ्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने बालगृह, निरीक्षणगृह संस्थेला दहा हजार रुपयांचा जिन्नस नुकताच सुपुर्द केला. Ration distribution by Chitpavan Mandal

समाजातील दानशूर मंडळींच्या मदतीवर बालगृह, निरीक्षणगृहाचा कारभार चालतो. शासनाकडून संस्थेला अनुदान मिळते. परंतु ते वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा देणग्यांवर संस्थेचे कामकाज केले जाते. निरीक्षणगृहातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात चांगले शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा देण्याकरिता संस्थाचालक नेहमीच प्रयत्न करत असतात. निरीक्षणगृहाचे सुपरिटेंडंट प्रथमेश वायंगणकर यांच्याकडे नाश्ता, भोजनाकरिता लागणारा शिधा वितरित करण्यात आला. यामध्ये तांदूळ, डाळी, तेल, मसाला आदींचा समावेश होता. Ration distribution by Chitpavan Mandal

या वेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, सदस्य मोहन पटवर्धन, अनंत आगाशे आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल संस्थेतर्फे चित्पावन ब्राह्मण मंडळाचे आभार मानले. Ration distribution by Chitpavan Mandal