गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली. Ranjita Charitable visit to Aarti Niradhar Sanstha
यावेळी या संस्थेच्या अध्यक्षा रंजिता ओतारी, सौ. वनिता काशीद, उपाध्यक्षा सौ. दिप्ती सुनिल सावंतदेसाई, सदस्य श्री. सुनिल सावंतदेसाई, सौ. अश्विनी अमोल ताम्हणकर यांनी भेट दिली. संस्थेला गरजेच्या भेटवस्तू रूपात मदत केली. वसतीगृहातील मुलांनी स्वागत गीत गात उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शर्मिला महाकाळ यांनी वसतीगृहातील सभासदांविषयी माहिती दिली. आरती निराधार सेवा फाऊंडेशन संस्थेच्या अध्यक्षा अनिताताई नारकर यांनी रंजिता ओतारी आणि पदाधिकारी यांचे स्वागत केले. रंजिता ओतारी यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे कार्य पाहून समाधान वाटल्याची भावना व्यक्त केली. तसेच संस्थेशी कायम जोडले राहू. निरपेक्ष भावनेने आरती फाऊंडेशनचे सेवाकार्य सुरू आहे. समाजातील संस्थांनी, एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक कर्तव्य या भावनेतून सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आपले विचारही ओतारी यांनी मांडले. Ranjita Charitable visit to Aarti Niradhar Sanstha

रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे. जी अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात लोकोपयोगी काम करीत आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य विषयक शिबीरं, विविध सरकारी दाखल्यांसाठी मार्गदर्शन शिबीरं असे अनेक उपक्रम रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशनने यशस्वीपणे राबविले आहेत. विधवा, निराधार महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवीत त्यांच्याप्रती आपली संवेदना वेळोवेळी व्यक्त केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव, महिलांसाठी विशेष उपक्रम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करीत संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सामाजिक कामांचा ठसा हा उमटविला आहे. रंजिता फाऊंडेशन आपले सामाजिक कर्तव्य पाळत आलं आहे आणि अगदी निरपेक्ष भावनेनं सामाजिक काम करणाऱ्या आरती निराधार फाऊंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांना यापुढेही आमचे सहकार्य राहील, असा विश्वास रंजिता ओतारी यांनी व्यक्त केला. आभार प्रदर्शन गीताने कार्यक्रमाने सांगता झाली. Ranjita Charitable visit to Aarti Niradhar Sanstha
