रत्नागिरी, ता. 31 : अपरांत हॉस्पिटलने दीपोत्सवाचे औचित्य साधून हॉस्पिटल अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण मधील सुप्रसिद्ध अस्थि विकार तज्ञ व अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ.गोपीचंद वाघमारे यांचे द्वारे झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय किर्तीचे रांगोळीकर श्री. संतोष केतकर सर हे परीक्षक म्हणून लाभले. Rangoli competition by Aparant Hospital
या स्पर्धेमध्ये अपरांत हॉस्पिटल मधील बिलिंग, रिसेप्शन, पी आर डिपार्टमेंट, हाउसकीपिंग, ऑपरेशन थिएटर, लॅब व नर्सिंग डिपार्टमेंट मधील कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सहभागी स्पर्धकांनी स्त्री व तिचे समाजातील योगदान व प्रगती, डॉक्टरांचे समाजातील योगदान, पाणी वाचवा जीवन वाचवा, आनंदी जीवन निरोगी हृदय, दीपावलीच्या शुभेच्छा अशा अनेक विषयांवर रांगोळ्या काढल्या. एरवी आपल्या रुग्णसेवेद्वारे रुग्णाच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या अपरांत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या रंगांनी रांगोळ्या सजवून सर्व प्रेक्षक, परीक्षक व मान्यवर यांची मने जिंकली. Rangoli competition by Aparant Hospital
हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नर्सिंग डिपार्टमेंटच्या नर्स रेवती भोसले, द्वितीय क्रमांक पी आर डिपार्टमेंटच्या सौ संध्या साळुंखे, व तृतीय क्रमांक पी.आर. डिपार्टमेंट चे श्री.शेखर भुवड यांना मिळाला. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीसांचे वितरण करण्यात आले. बक्षीस समारंभ अपरांत हॉस्पिटलचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ.अब्बास जबले. श्री. चंद्रकांत कुलकर्णी व परीक्षक श्री. संतोष केतकर सर यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्प समन्वयक डॉ.श्रद्धा जाधव यांनी स्पर्धक, मान्यवर, व परीक्षक या सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अपरांत चे संचालक डॉ शेखर पालकर, श्री जवाहर चंदनशिवे व एच आर इन चार्ज तानाजी शिंदे यांचे सहकार्य लाभले. Rangoli competition by Aparant Hospital