नीलेश राणे, देशभरात मराठा बँक उभारण्याचा मानस आहे
गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन गुहागर तालुक्यात उभे राहत आहे. यासाठी सर्वाधिक योगदान राणेंचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात असे मराठा भवन उभे रहावे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार नीलेश राणे (MP Nilesh Rane) यांनी केले. ते शृंगारतळी येथे क्षत्रिय मराठा युवा संघटना (Kshatriya Maratha Youth Association) गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ च्या बक्षिस वितरण समारंभात बोलत होते. Rane family to contribute for Maratha Bhavan


राणे म्हणाले की, मराठ्यांच्या प्रेमापोटी मी कु़डाळमधून थेट गुहागरला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात अशाप्रकारची मराठा समाजाची ही एकमेव स्पर्धा होत आहे. याचा मला आनंद आहे. राज्यात आपले सरकार असून मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे आपल्याला मराठा भवन उभारणीसाठी कोणताही अडचण येणार नाही. आपण तयार केलेले प्रस्ताव त्यांच्याकडून मंजूर करुन घेऊ. अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत लागते. ती मदत करण्यासाठी मराठा बँक उभारण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मराठा बँका व त्यांच्या शाखा व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तेही पूर्णत्वास जाईल. असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. Rane family to contribute for Maratha Bhavan

