गुहागर, ता. 16 : धोपावे गावातील प्रतिष्ठित जेष्ठ समाजसेवक श्री.रामचंद्र गंगाराम डावळ यांनी शनिवार, दि. १०.०२.२०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता अखेरचा श्वास सोडला. वयाच्या ८७ व्या वर्षांत अल्पशा आजाराने धोपावे-डावळवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. Ramachandra Dawal is No More
शांत, संयमी रामचंद्र डावळ यांनी मुंबईत खाजगी मालवणकर कंपनीत कामाला राहुन आपल्या गावाची तालुक्याची नि:स्वार्थी सेवा केली. मुक्या प्राण्यांवर, निसर्गावर, जिवापाड प्रेम, जंगल परीसरात झाडा-झुडपानी वाढलेल्या जंगलमय पायवाटा साफ करणारा. धोपावे, वेलदुर, पवार साखरी, आरे, पंचक्रोशीतील कोणाची जमिनीची हद्द सुरू होते ते अचुक सांगणारा. निरपेक्ष, सेवाभावी कार्यकत्यास गाव मुकला आहे. Ramachandra Dawal is No More
त्यांनी आपल्या कारकीर्दीत माजी आमदार समाजनेते स्व.रामभाऊ बेंडल साहेब यांचे सहकारी, जेष्ठ समाजसेवक, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित कार्यकर्ते, अध्यक्ष डावळवाडी विकास मंडळ, मुंबई, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई गुहागर शाखा अंतर्गत गुहागर गट कार्याध्यक्ष, अंजनवेल, वेलदुर, धोपावे सहकारी सोसायटी –उपचेरमन, धोपावे ग्रामपंचायत-उपसरपंच, तंटामुक्ती कमिटी धोपावे –सदस्य, ग्रामशिक्षण समिती धोपावे- सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी सन -२००९, स्व.रामभाऊ बेंडल साहेब यांच्यासोबत सन -१९६२ पासुन निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, सद्गती प्राप्त होवो. डावळ कुटुंबियांच्या दुःखात धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई, कार्यकारिणी आणि सभासद, गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. Ramachandra Dawal is No More