देवधे हरमलेवाडी मंडळ प्रथम तर द्वितीय आई बनदेवी नाटय नमन गवाणे
रत्नागिरी, ता. 08 : हातखंबा येथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळ हातखंबा डांगेवाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय राम-रावण भव्य नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नवलाई नमन मंडळ हरमलेवाडी (देवधे ) लांजा नमन मंडळाने उत्कृष्ठ सादरीकरण करुन सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. द्वितीय क्रमांक आई बनदेवी नाटय नमन गवाणे, लाजा या मंडळाने पटकावला. तसेच तृतीय क्रमांक आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हातखंबा सनगरेवाडी या मंडळाने मिळविला. या सर्व विजयी स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. Rama-Ravana war dance competition in Ratnagiri

कोकणचे खेळे – नमन ही पारंपरिक कला जागृत ठेवण्यासाठी मंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवलाई नमन मंडळ, हरमलेवाडी-लांजा आई बनदेवी नाटय मंडळ, गवाणे- लांजा, जुगाई देवी नमन मंडळ, मांजरे, जय गणेश मित्रमंडळ, पाडावेवाडी- मिरजोळे, आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ, सनगरेवाडी, नवतरुण नमन मंडळ तळेकांटे – रेवाळेवाडी, नमन मंडळ भायजेवाडी वेळवंड, पावणा देवी मंडळ, देऊड जाकादेवी, क्रांती कलामंच नमन मंडळ तारवेवाडी तसेच सोमेश्वर नाटय नमन मंडळ वांद्री अशा १० मंडळांनी सहभाग घेतला होता. Rama-Ravana war dance competition in Ratnagiri
पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गराटे यांनी सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला कोकण नमन कला मंचाचे जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे यांची उपस्थिती लाभली. या वेळी गुणवंत कलाकारांचा मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुनिल डांगे व सल्लागार प्रकाश डांगे यांनी मंडळाच्या प्रगतीबाबत प्रास्ताविक केले. Rama-Ravana war dance competition in Ratnagiri
राम-रावण नृत्य स्पर्धेसाठी अभ्यासू व उत्कृष्ठ परीक्षणातून नमन मंडळाना मोलाचे मार्गदर्शन करणारे श्री. गोसावी, महेश कांबळे व संदेश रावणंग यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन मंडळाचे सचिव प्रथमेश डांगे व सदस्य आदेश डांगे यांनी सुरेख केले. Rama-Ravana war dance competition in Ratnagiri
