गुहागर, ता.18 : बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यासणानिमित्त जीवन ज्योती विशेष दिव्यांग शाळा पाटपन्हाळे, ता गुहागर येथे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना राखी बांधून साजरा करण्यात आला. Rakshabandhan at Jeevan Jyoti School

जीवन ज्योती विशेष शाळा सदैव मतिमंद मुलांच्या प्रगतीसाठी व शैक्षणिक कार्यासाठी कायम अग्रेसर असते. या शाळेत अनेक वर्ष मुलांना सणांचे महत्व, तसेच दिव्यांग असूनही आपण एकमेकांचे रक्षण करू शकतो. हे कायम त्यांना पटवून देण्यात येते. त्यांच्यातील भाऊ बहिणीचे एक अनमोल नाते निर्माण करणारे रक्षाबंधन हा सण शाळेत आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी जीवन ज्योती शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा शिंदे, सहशिक्षक प्रवीण तांबिटकर, सहशिक्षिका स्नेहा आयरे यांनी भावा बहिणीचे प्रतीक असलेली राखी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी बांधत असताना भाऊ बहिण या नात्याचे एक वेगळे रूप त्यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांसमोर मांडले. Rakshabandhan at Jeevan Jyoti School

