रत्नागिरी, ता. 31 : तालुक्यातील खेडशी केंद्रांतर्गत जि प शाळा आदर्श वसाहत कारवांची वाडी नं. 2 मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपशिक्षिका श्रीमती उपाध्याय यांनी मुलांना रक्षाबंधन या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. Raksha Bandhan Program at Caravanchiwadi School

या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका श्रीमती रेणुका उपाध्याय, मुख्याध्यापक श्रीमती स्मिता सावंत, उपशिक्षक श्री. दिनेश डोरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादक उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या. लो, मणी, पेन्सिल, जुने पेन इत्यादी साहित्य वापरून वेगवेगळ्या डिझाईन मध्ये राख्या तयार केल्या. स्वनिर्मितीतून तयार करण्यात आलेल्या राख्यांबाबत विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद होत होता. राख्या तयार झाल्यानंतर इयत्तावार मुलगे व मुली यांचे गट करून रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. छोट्या मुलांचा आपल्या भावाला आरती ओवाळून हातात राखी बांधण्याचा अनुभव काही वेगळाच होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी व सर्व सदस्य उपस्थित होते. Raksha Bandhan Program at Caravanchiwadi School

