गुहागर, ता. 12 : गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख व शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काल गुहागर शहर शिवसेनेची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी गुहागर शहर संघटक पदी राकेश साखरकर, शिवसेना शहर सचिव पदी भरत कदम, युवासेना शहरप्रमुख पदी राकेश गावडे, युवासेना उपशहरप्रमुख पदी चिन्मय कचरेकर व सर्व पदाधिकारी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. Rakesh Sakharkar as Shiv Sena City Organizer

सदर बैठकीला मनीष मोरे, माजी नगरसेवक अमोल गोयथळे, युवासेना जिल्हा सचिव अमरदीप परचुरे, विरेश बागकर, संदेश कचरेकर, दत्ताराम जागळी, शाम आठवले, उदय आठवले, अतुल साखरकर, नितीन सांगळे, राजेंद्र साटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. Rakesh Sakharkar as Shiv Sena City Organizer

