• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

by Guhagar News
July 20, 2023
in Bharat
87 1
0
Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard
171
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्‍ली, ता. 20 : भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. कोची येथे इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, येथे त्यांनी तोफखाना आणि शस्त्रे प्रणालींमध्ये विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. युनायटेड किंगडममधून त्यांनी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन अभ्यासक्रम  केला आहे. भारतीय तटरक्षक दलाचे पहिले गनर म्हणून ते ओळखले जातात. राकेश पाल यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल 2013 मध्ये तटरक्षक पदक आणि 2018 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक प्रदान करण्यात आले. Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

34 वर्षांच्या आपल्या दिमाखदार कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम), गांधीनगर, उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि नवी दिल्लीत भारतीय तट रक्षक दलाच्या मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक ही त्यातील प्रमुख पदे आहेत. नवी दिल्ली येथे तटरक्षक दलाच्या मुख्यालयात संचालक (पायाभूत सुविधा आणि कामे) आणि प्रधान संचालक (प्रशासन) म्हणून त्यांनी उत्तमपणे कामगिरी बजावली आहे. त्यांना सागरी मोहिमांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी सर्व समर्थ, आयसीजीएस विजीत, आयसीजीएस सुचेता कृपलानी, आयसीजीएस अहिल्याबाई, आणि आयसीजीएस सी -03 या तटरक्षक दलाच्या सर्व प्रकारच्या जहाजांवर अधिकारी म्हणून काम केले आहे. गुजरातमधील फॉरवर्ड एरियाच्या ओखा आणि वाडीनार या दोन तटरक्षक तळांवरही त्यांनी अधिकारी म्हणून कामाचा अनुभव घेतला आहे. Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

राकेश पाल यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती मिळाली आणि त्यांची नवी दिल्ली येथे तटरक्षक दल मुख्यालयात नियुक्ती झाली. फेब्रुवारी 2023 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्याच्याकडे सोपवण्यात आला. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा राबवल्या. त्यात अंमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करणे, तीव्र चक्रीवादळाच्या वेळी नाविकांची सुटका करणे, परकीय तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, तस्करी विरोधी कारवाया, चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी मदत आणि किनारी सुरक्षा सराव यांचा समावेश आहे. Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndian Coast GuardLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRakesh Pal appointed as Director General of Coast GuardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभारतीय तटरक्षक दलमराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.