युवा सेना तालुकाध्यक्ष राज विखारे यांचा भाजपवर पलटवार, तुम्ही वाहिलेली लाखोली आम्ही विसरलेलो नाही
गुहागर, ता. 31 : ज्यांचे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर खुशाल कारवाई करावी, सरकार तुमचेच आहे मग कारवाई करायला घाबरता का, असा सवालही विखारे यांनी लगावला. गुहागर तालुका उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेची पत्रकार परिषद गुहागर येथे पक्ष कार्यालयात झाली. यावेळी युवासेना अध्यक्ष राज विखारे यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी केलेल्या आरोप व टिकेला या पत्रकार परिषदेतून जोरदार प्रतित्त्युर दिले. ते म्हणाले, आ. जाधव शृंगारतळीतील एका भाजपच्या कार्यकर्त्यावर बोलले हे भाजपला झोंबले. आ. जाधव हे अभ्यासू असून ते विचारपूर्वकच बोलतात. त्यांच्यावर नकला, टिंगल टवाळ्या केल्याचे आरोप करण्यात आले मात्र, नक्कल करायला अक्कल लागते, असा टोला विखारे यांनी लगावला. Raj Vikhare’s counterattack on BJP
निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालय सुरु करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे हे येथे येऊन म्हणाले होते. केंद्रात, राज्यात सरकार तुमचे आहे मग अजून दोन वर्षे झाले तरी ते सुरु करण्याची तुमची मानसिकताच नाही, अशी टिका करुन खासगी हाँस्पिटल चालावे म्हणून निरामय सुरु होत नसावे, असा संशय विखारे यांनी व्यक्त केला. तुमच्या नेत्यांवर, पक्षावर झालेली टीका तुम्हाला सहन होत नाही. मग आमच्या नेत्यावरही टीका करताना पण विचार करा, आम्हीही जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा विखारे यांनी दिला. Raj Vikhare’s counterattack on BJP
मार्गताम्हणे येथील एमआयडीसी डाँ. नातूंमुळेच गेली. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. २०२४ मध्ये निवडणूक प्रचारार्थ शृंगारतळी येथील झालेल्या सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनीच आपल्या भाषणात जर डाँ. नातू सांगत असतील तर एमआयडीसी रद्द करा, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले, असे पालकमंत्र्यांनी जाहीर सभेतून सांगितले. एमआयडीसी रद्द करुन डाँ. नातू यांनी स्थानिक तरुणांचा रोजगार काढून घेतल्याचा आरोपही विखारे यांनी केला. Raj Vikhare’s counterattack on BJP
आ. भास्कर जाधव गुहागरमधून गेले चारवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ते धसका कधी घेत नाहीत उलट तेच दुसऱ्याला धसका घ्यायला लावत असून त्यांच्यामुळेच अनेकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा पलटवार युवासेना शहराध्यक्ष राज विखारे यांनी भाजपचे निलेश सुर्वे यांनी केलेल्या आरोपावर केला. दोन वर्षापूर्वी तुमच्याच नेत्याने गुहागरमध्ये येऊन आ. जाधव यांना वाहिलेली लाखोली गुहागरची युवा सेना विसरलेली नसून यापुढेही आमच्यावर टीकाटिपण्णी केल्यास भाजपला आम्ही जशास तसे उत्तर देवू, असा इशारा विखारे यांनी दिला. Raj Vikhare’s counterattack on BJP
