पुणे, ता. 11 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Rain in the state till 15 May
तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना १५ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. Rain in the state till 15 May
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ११ व १२ तर, सातारा येथे १२ तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात १२ मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, येथे मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. Rain in the state till 15 May