गुहागर, ता. 15 : काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील काही भागामध्ये पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. यामध्ये नागरिकांचे अंशतः नुकसान झाले आहे. Rain damage in Guhagar
तालुक्यातील काताळे येथील सुरेश पवार यांच्या घराचा बांध कोसळला मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच प्रेरणा पवार यांची पडवी कोसळून नुकसान झाले. असगोली मधलीवाडी येथील योगिता रमाकांत धोंडू जोशी यांच्या गोठ्यावर वडाचे झाड कोसळून गोठ्याचे अंशतः नुकसान झाले. सदर पंचनामा करण्यात येऊन अंदाजे ३२०० रुपये इतके नुकसान झाले आहे. Rain damage in Guhagar