• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पावसावर विश्रांतीचे ‘ढग’ 20 जुलै पर्यंत

by Mayuresh Patnakar
July 9, 2026
in Bharat
225 2
0
Rain break
441
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 09 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता असून, ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खंड २० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे.  Rain break

अफगाणिस्तानकडून वाहणारे कोरडे वारे गुजरातच्या दिशेने सरकत असून, ते कोकण व उर्वरित महाराष्ट्रावर घोंघावणार आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता कमी होईल. प्रशांत महासागरात तयार झालेल्या ‘एल निनो’चा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. या दोन्ही घटकांमुळे अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राच्या इतर भागांत मान्सूनचे ढग तयार होण्यास बाधा निर्माण झाली आहे. Rain break

ढगच तयार होणार नसल्याने पावसाची सक्रियता कमी होईल. ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा वेग कमी होईल. पाऊस पूर्णपणे गायब होणार नाही. अधून-मधून पावसाच्या एक-दोन मोठ्या सरी नक्कीच कोसळतील; मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जसा मुसळधार पाऊस झाला, तसा प्रभाव व वेग आता बघायला मिळणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार २० जुलैपर्यंत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यानंतर हवामानात जे बदल होतील, त्यानुसारच मान्सूनच्या पुढील सक्रियतेची दिशा ठरेल. Rain break

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRain breakटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.