• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात घरांवर वीज पडून नुकसान

by Ganesh Dhanawade
May 21, 2025
in Guhagar
294 3
4
Rain accompanied by lightning in Guhagar
577
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विदयुत उपकारणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येहि वीज कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, त्याची कोणती नोंद झालेली नाही. Rain accompanied by lightning in Guhagar

यावर्षी उन्हाच्या उकाड्यात पावसाने लवकरच हजेरी लावली आहे.  गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक कोसळलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसासोबत विजांच्या कडकडाटाने मोठी नुकसानी केली आहे. मंगळवारी सायंकाळी मौजे भातगाव धक्का (गोळेवाडी ) येथील श्रीम. वनिता रामचंद्र गावडे यांच्या घरावर वीज कोसळून  विजेचे बोर्ड, वायरिंग याचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच पिंपर येथील श्रीम.सुवर्णा शशिकांत मोरे यांच्या घरावर देखील  वीज पडून सगळे विद्युत उपकरण जळली आहेत. त्यात कुठलीही जीवितहानी नाही. हेदवी बेलवाडी येथील नारायण भिकाजी कुवारे यांच्या राहत्या घराच्या शेजारी वीज पडल्यामुळे त्यांच्या घरातील विजेच्या उपकरण तसेच वायरींगचे अंदाजे 18 हजाराचे नुकसान झाले आहे. Rain accompanied by lightning in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRain accompanied by lightning in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share231SendTweet144
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.