• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

by Mayuresh Patnakar
July 2, 2026
in Maharashtra
152 2
0
गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण
299
SHARES
853
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडणार

गुहागर, ता. 02 : यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्वाची लगबग सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धावणाऱ्या रेल्वेगाडयांचे आरक्षण ३ जुलैपासून खुले होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी असल्याने ११ सप्टेंबरपासूनची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडणार आहे.  Railway reservations for Ganeshotsav

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण ६० दिवस अगोदर खुले होते. त्यानुसार ३ जुलैपासून आरक्षण खुले होत असल्याने गणेशभक्तांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. १ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण ३ जुलै रोजी खुले होणार आहे. यानंतर तारखनिहाय आरक्षण खुले होणार आहेत. गणेशचतुर्थीच्या दिवशीचे म्हणजे १४ सप्टेंबरचे आरक्षण १६ जुलै रोजी खुले होईल. रेल्वे प्रशासनाने आरक्षण व प्रवासाच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी गणेशोत्सव कालावधीत नेमक्या किती स्पेशल गाड्या चालवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. Railway reservations for Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRailway reservations for Ganeshotsavटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.