अनंत गीते, पराभव झाला तर राजकारणातून संन्यास घेणार
गुहागर, ता. 27 : राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय रहाणार नाहीत. त्यांच्यासाठी एक मत देण्याचा अधिकार असलेला खासदार म्हणून मला निवडून द्या. आज देशात मोदी विरुध्द लाट आहे. आजपर्यंत शिवसेनेसोबत नसलेला मुस्लीम समाज आपल्यासोबत आला आहे. असे प्रतिपादन रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी केले. ते शृंगारतळी येथे प्रचार सभेत बोलत होते. Rahul Gandhi is the PM of the country
गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गट आणि पाटपन्हाळे गणातील काही गावांची महाविकास आघाडीची प्रचारसभा भवानी सभागृहात झाली. या सभेत बोलताना अनंत गीते म्हणाले की, ही 9 वी लोकसभेची निवडणूक मी लढवत आहे. 6 वेळा आपण सर्वांनी मला खासदार केले आहे. आजची निवडणूक वेगळी आहे. महाराष्ट्राने यापूर्वी, फोडाफोडीचे, कपट कारस्थानांचे दुर्दैवी राजकारण या आधी पाहिले नव्हते. भाजपने ते सुरु केले. विविधतेमध्ये एकता असलेले, लोकशाही ही ओळख असलेले हे राष्ट्र चुकीच्या दिशेने चालवले जात आहे. संविधान वाचविण्याची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा, सन्मान राखला नाही. या परिस्थितीमुळे देशात इंडिया आघाडीची सुनामी आली आहे. Rahul Gandhi is the PM of the country
2019 च्या निवडणुकीत गीतेंना मत म्हणजे मोदींना मत असे सांगून तटकरेंनी एकहाती मुस्लीम समाजाची मते घेतली. मात्र आज मोदींच्या मांडीवर जावून बसलेल्या तटकरेंना काहीही केले तरी मुस्लीम समाजाची मते मिळणार नाहीत. आता माझ्या समाजाची मते फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाहीए. तटकरेंकडे मते मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने मते विकत घ्यावी लागतील. परंतु येथील मतदार पापाचा, शापाच्या पैशाला हात लावणार नाही. रायगड लोकसभा मतदारसंघातून 70 टक्के मतांनी मी विजयी होणार आहे. असे झाले नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन. Rahul Gandhi is the PM of the country
या प्रचार सभेला आमदार भास्कर जाधव, जि.प.चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, उ.बा. ठा. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम, तालुका प्रमुख सचिन बाईत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल घारे, श. प. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्यासह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. Rahul Gandhi is the PM of the country
सभेतच रंगला वाद प्रतिवादाचा खेळ
अनंत गीतेंनी भाषणाची सुरवात करताना मागील लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलो. कारण तटकरेंचे इथे काय आहे. असे विधान केले. हे वाक्य ऐकताच सॉरी सॉरी गीते साहेब असे म्हणत आमदार जाधव उठून उभे राहीले. मला असे वाटते की हे बोलणं आता टाळलं पाहीजे. या वाक्याचा वेगळा अर्थ लावून प्रचार केला जातोय. भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंच्या बाजुन होते. मी पक्षात राहुन कधीही गद्दारी केलेली नाही. असे सांगून आमदार जाधव आसनस्थ झाले. पण तरीही माझे पुढचे वाक्य आपण ऐकावे असे गीतेंनी सांगितल्यावर आपली प्रत्येक सभेतील भाषणे मी ऐकली आहेत असे सांगत आमदार जाधव यांनी मान फिरवत नाराजी व्यक्त केली. यावेळी अनंत गीतेंचा चेहरा पडला होता. परंतु प्रचार सभा असल्याने त्यांनी विषय बदलत भाषणाला सुरवात केली. Rahul Gandhi is the PM of the country
भोजनालाही थांबले नाहीत गीते
साधारणपणे प्रचारसभांच्या दौऱ्यात सर्व नेते भोजनासाठी एकत्र येतात. अशावेळी पुढच्या सभेत कोणी काय बोलायचे याची नेत्यांमध्ये चर्चा होते. आजही भवानी सभागृहातील सभा संपल्यावर आमदार जाधव यांनी अनंत गीते आणि त्यांच्या सोबत असलेले जिल्हाप्रमुख सचिन कदम, नित्यानंद भागवत यांना एकत्र जेवायला येण्याचा निरोप दिला. मात्र अनंत गीतेंनी वेळणेश्र्वरच्या सभेसाठी पुढे जातो असा उलटा निरोप दिला. Rahul Gandhi is the PM of the country