गुहागर, ता. 30 : तालुक्यातील निगुंडळ, तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गुहागर तालुका युवा सेना प्रमुख इम्रान घारे यांचे वडील रफीक ईस्माईल घारे यांचे बुधवारी, 29 मार्चला पहाटे ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यावेळी ते ८३ वर्ष वयाचे होते. Rafic Ghare in Nigundal is no more

रफिक घारे निगुंडळ व तळवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. सध्या ते शृंगारतळी येथे वास्तव्यास होते. बुधवारी, 29 मार्चला सकाळी ७ वाजता त्यांना अचानक छातीमध्ये दुखू लागले. म्हणून त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्यांचे निधन झाले होते. बुधवारी, 29 मार्चला रात्री ११ वाजता निगुंडळ येथील कब्रस्थानामध्ये त्यांचा दफनवीधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. Rafic Ghare in Nigundal is no more

