• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

by Mayuresh Patnakar
October 10, 2026
in Guhagar
36 1
0
Questions about healthcare at the health center
71
SHARES
204
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कर्मचारी नियुक्त चिखलीत, सेवा मात्र दुसरीकडे?

गुहागर, ता. 10 : गुहागर–चिपळूण मुख्य मार्गावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या केंद्रात कागदोपत्री नियुक्ती असलेल्या आरोग्य सेविका व महिला सुपरवायझर यांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या घराजवळील ठिकाणी कामगिरीवर पाठविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे दुर्गम भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होत असून, संबंधित कर्मचाऱ्यांना तालुक्याबाहेर कामगिरीवर पाठविण्याच्या या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. Questions about healthcare at the health center

चिखली प्राथमिक आरोग्य हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शासनाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. मात्र या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी कामगिरी लावली असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत आहे. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री-अपरात्री रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित असताना प्रत्यक्ष कामगिरी गुहागर तालुका बाहेर म्हणजेच रत्नागिरी व साखरपा या ठिकाणी लावण्यात आली आहे. तर ते कोणत्या नियमांनुसार आणि कोणत्या कारणास्तव देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली किंवा विशेष सवलत देऊन हे निर्णय घेतले आहेत का याची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे. Questions about healthcare at the health center

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३२ गावांतील नागरिकांना वेळेत आणि पुरेशी आरोग्यसेवा मिळावी, यासाठी मंजूर पदांवरील कर्मचाऱ्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती आहे त्या ठिकाणीच त्यांना कामाच्या आदेश द्यावेत. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आता आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का? संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देणार का? की चिखली परिसरातील नागरिकांना अपुऱ्या आरोग्यसेवेचा सामना असाच करावा लागणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. Questions about healthcare at the health center

गुहागर तालुक्यात नियुक्ती असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांची तालुक्याबाहेर कामगिरी लावण्यामागे कोणाचा दबाव किंवा वशिला आहे का? या निर्णयामुळे स्थानिक आरोग्यसेवेवर झालेल्या परिणामांची चौकशी स्थानिक आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य तसेच सभापती व उपसभापती करणार का? की नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असाच दुर्लक्षित राहणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. Questions about healthcare at the health center

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarQuestions about healthcare at the health centerटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.