एम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्सचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम,आबलोली,
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली येथे सुयश कॉम्पुटर्स आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचे सहकार्याने प्रश्न मंजूषा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त एम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्स सेंटर आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने असा नुकताच उत्साहात संपन्न झाला. Question Manjusha Program by MKCL & Suyash Computers


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित(एम.के.सीएल) हि संस्था महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्रातील प्रमुख ९, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे. सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात हि संस्था गेली २१ वर्ष कार्यरत आहे. Question Manjusha Program by MKCL & Suyash Computers


ही परिक्षा काही क्रांतिकारी, सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरूष यांच्या जिवनाचा अभ्यास करून त्यावर आधारीत प्रश्नांवर घेण्यात आली. हा उपक्रम एम.के.सीएलने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवला आहे. सदरील परिक्षा ऑफ लाईन पध्दतीने म्हणजेच पेपरवर दिली जात असून हि परिक्षा विनामुल्य घेण्यात येत आहे. अशी मौलिक माहिती सुयश कॉम्पुटर्सचे संचालक संदेश साळवी यांनी दिली. Question Manjusha Program by MKCL & Suyash Computers

