ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील ऊ अंटावा या गाण्याचे मराठीत रुपातंर केले आहे. आणि विशेष म्हणजे कोकणातील हे पहिलेच गीतकार आहेत. त्यांनी पुष्पाचे अधिकृत ऊ अंटावा हे गीत लिहीले आहे. साऊथ फिल्म जगतामधील प्रसिध्द अशा आदित्य म्युझिकच्या पुष्पा या चित्रपटाच्या ऊ अंटावा या गाण्याचे मराठी मध्ये रुपातंर केले आहे, ते आपल्याला आदित्य म्युझिकच्या अधिकृत चॅनेलवर पाहायला मिळेल. Pushpa movie song now in Marathi
या आधीही या कोकणपुञाची गाणी दिग्गज गायकांनी स्वरबध्द केली आहेत. ऊ अंटावा (ऊ बोलणार की तू) हे मराठी गीत गायिका रागिणी कवठेकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायिले आहे. तर या गाण्याचं मिक्स मास्टरिंग केले आहे. डाँनी हजारिका या आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी. समर्पक शब्द, श्रवणीय संगीत आणि तसेच दृश्य चित्रण हे या गाण्याचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे कमी अवधीत या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे हे गाणे सर्वांनी पाहावे आणि चॅनेलवर अभिप्राय हि द्यावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. Pushpa movie song now in Marathi