गुहागर, ता. 07 : तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती गुहागर, प्रकृति फाउंडेशन व मर्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्स, पाऊच आणि सॅक तयार करण्याचे तीन दिवशीय प्रशिक्षण शृंगारतळी येथे दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ रोजी पार पडले. यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Purse making training for women


या प्रशिक्षणात बचत गटातील महिलांना पर्स जलद करण्यासाठी टिप्स तसेच विक्री व्यवस्था मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. महिलांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला. गटविकास अधिकारी श्री शेखर भिलारे यांच्या प्रेरणेतून तसेच प्रकृति फाउंडेशन च्या मिलन जंगम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आणि मेधा शहा तसेच मुग्धा देसाई ( मुंबई) यांच्या अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे महिलांना उत्तम प्रशिक्षण मिळाले. असे काही महिलांनी सांगितले. Purse making training for women