रिपब्लिकन पक्ष (आठवले) तालुका गुहागर आणि बौद्धजन सहकारी संघाची आग्रही मागणी
संदेश कदम, आबलोली
परभणी, ता. 17 : शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असणाऱ्या परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी तोडफोड करुन विटंबना करण्यात आली. विटंबना करणा-या गुन्हेगारास पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. तरी अशा समाजद्रोही, राष्ट्रद्रोही, कृती करणा-या गुन्हेगारास व त्या मागील सुत्रधारास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी जे निषेध आंदोलन करण्यात आले त्यामध्ये निरपराध आंदोलक आयु. सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिस कोठडीत मारहाण करुन त्याचा मृत्यू झाला आहे सदर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना बडतर्फ करावे. Punish those who defame the Constitution
अशी निवेदनाद्वारे आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाच्या वतीने आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने मान. राज्यपाल साहेब, राजभवन, महाराष्ट्र राज्य मुंबई, मान. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, मान. तहसीलदार साहेब, तहसीलदार कार्यालय गुहागर यांना या राजकीय पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष आयु. संदिप कदम, जिल्हा उपाध्यक्ष आयु.विद्याधर कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका युवाध्यक्ष विजय असगोलकर, तालुका चिटणीस दशरथ पवार, तालुका प्रवक्ता शशिकांत जाधव, आणि धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष आयु. सुरेश (दादा) सावंत, उपाध्यक्ष विद्याधर कदम, उप कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, संस्कार कमिटी अध्यक्ष शशिकांत जाधव कोषाध्यक्ष वसंत कदम, सरचिटणीस सुनिल गमरे यांनी हे लेखी निवेदन तहसीलदार गुहागर, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे गुहागर यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मान. उपविभागीय अधिकारी उपविभाग कार्यालय चिपळूण, मान. पोलिस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे गुहागर यांना देण्यात आले आहे. Punish those who defame the Constitution