पाटपन्हाळे तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला पुजार यांची भेट
गुहागर, ता. 02 : कृषी विभाग, पंचायत समिती, गुहागरच्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाटपन्हाळे येथील शेतकरी श्री.तेजस तेलगडे व श्री. तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवड करण्यात आली. या कलिंगड लागवडीला जि. प. रत्नागिरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या हस्ते कलिंगड तोडणीचा शुभारंभ करण्यात आला. व त्यांनी पं.स.कृषी विभाग व शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले. Pujar’s visit to Watermelon plantation

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार हे विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गुहागर दौऱ्यावर आले असताना पाटपन्हाळे येथील कलिंगड उत्पादक शेतकरी तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते कलिंगड तोडणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कलिंगडाचा आस्वादही घेतला. गुहागर चिपळूण रोडवर पाटपन्हाळे येथे कलिंगड विक्री केंद्रालाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुजार यांनी भेट देऊन तेलगडे यांना शुभेच्छा दिल्या. Pujar’s visit to Watermelon plantation

तीन महिन्याच्या कमी कालावधीतील ‘कॅश क्रॉप’ असलेल्या कृषी विभाग, पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कलिंगड लागवडीच्या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुजार यांना यावेळी दिली. पुढील वर्षी या प्रकल्पाच्या क्षेत्रात वाढ करण्याच्या सूचना करून लाल रंगाच्या कलिंगडाव्यतिरीक्त पिवळ्या व इतर रंगाचा गर असलेल्या कलिंगडाचा तसेच वेगवेगळ्या आकाराचे कलिंगड उत्पादीत करण्याचा प्रयोग पुढील वर्षी करावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांना केली. Pujar’s visit to Watermelon plantation
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, सरपंच विजय तेलगडे, ग्रामपंचायत सदस्य पुजा पागडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्राम विकास अधिकारी श्री. बागूल व इतर अधिकारी यांच्या सह शेतकरी तुकाराम तेलगडे, तेजस तेलगडे उपस्थित होते. Pujar’s visit to Watermelon plantation

