गुहागर, ता.17 :अवघ्या चार वर्षांत आर्थिक निकष प्रमाणब्ध राखत, आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा परिपूर्ण वापर व जलद गतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ५ नवीन शाखांना मंजुरी मिळवून शाखा विस्तार करण्या करता पतसंस्था सज्ज झाली आहे. संस्था पाचव्या वर्षात पदार्पण करताना संचालक मंडळाने सन २०२३ पासून प्रतिवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा निर्णय केला.पतसंस्थेच्या सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शृंगारतळी शाखेमध्ये श्रीमती हेमलता शरद गुहागरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. Publication of Kharvi Credit Institution Calendar

काही दिवसांपूर्वीच शृंगारतळी येथील शाखेचे उद्घाटन झाले. नईएफटी, आरटीजीएस, क्यूआर कोड या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच एसएमएस सुविधेचा प्रारंभ केला. आज संस्थेत १००% सायबर सेक्युरिटी सुविधा आहे. यावेळी सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी व समन्वय समिती पदाधिकारी समाजातील मान्यवर व सभासद बंधू – भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. Publication of Kharvi Credit Institution Calendar
ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या परिपूर्ण करणे ही काळाची गरज ओळखून संस्था त्यादृष्टीने मार्गक्रमण करीत असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा देण्याचा मानस असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगून लवकरच दाभोळ, खंडाळा,पालशेत व पूर्णगड शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होतील यासाठीचे नियोजन सुरू आहे.सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था अधिक मजबूत कशी होईल याकडे सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी व समन्वय समिती पदाधिकारी मेहनत घेत आहेत. Publication of Kharvi Credit Institution Calendar
