गुहागर, ता. 19 : विद्यार्थी गुणगौरव गुणवत्ता क्षेत्र व शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते नुकतेच जानवले येथील विशेष कार्यक्रमांमध्ये संपन्न झाले. Publication of Calendar by Teachers Union
सदर दिनदर्शिका चे प्रकाशन शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी गळवे साहेब, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, केंद्रप्रमुख खरडे साहेब, केंद्रप्रमुख तुकाराम निवाते, केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, अखिलचे शिक्षक नेते चंद्रकांत पागडे, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, संघाचे अध्यक्ष दीपक साबळे, शिक्षक नेते कैलास शार्दुल, गुहागर तालुका प्राथमिक समितीचे सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, अखिल चे पदाधिकारी सुधीर गोणबरे, सुधीर कांबळे, पल्लवी डिंगणकर, दिनेश जानवळकर, पंचायत समिती आय ई डी मोहिते मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. Publication of Calendar by Teachers Union
त्यावेळी बोलताना विस्ताराधिकारी गावणकर साहेब म्हणाले की, शिक्षण क्षेत्रामध्ये अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे कामकाज अतिशय गौरवास्पद आहे. गुणवत्ता विकासासाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन परीक्षा तसेच नवोदय स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी मध्ये विशेष प्राविण्य केलेले विद्यार्थी, नासा इसरो मध्ये निवड झालेले विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करून गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात कैलास शार्दुल, नरेंद्र देवळेकर, दीपक साबळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. Publication of Calendar by Teachers Union