राजरत्न आंबेडकर, आनंदवन बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा या धम्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी केले. ते गुहागर तालुक्यातील आबलोली येथे स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. Publication of Anandavan Buddha Vihara souvenir

गुहागर तालुक्यातील आनंदवन बुध्द विहार, आबलोलीच्या २५ वा वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा या धम्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर आले होते. त्यांचे आबलोलीत आगमन झाल्यावर समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर आबलोली बाजारपेठेतुन राजरत्न अशोकराव आंबेडकर यांना मिरवणूकीने फटाक्यांच्या आतिषबाजीत महापुरुषांच्या, महामातांच्या घोषणांच्या जयजयकारात बुध्द विहारात आणण्यात आले. राजरत्न आंबेडकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. Publication of Anandavan Buddha Vihara souvenir

यावेळी बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या समाजाला हक्क आणि अधिकार देण्यासाठी व्यतित केले. इतिहासामध्ये महाडमधील चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून नोंद झालेल्या घटनेला सत्याग्रह म्हणणे चुकीचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले ते ऐतिहासिक आंदोलन होते. पाणी नाकारणाऱ्यांपर्यंत योग्य संदेश पोचविण्याचे काम या आंदोलनाने केले. माणसाला माणसासारखे जगता वागता आले पाहिजे. त्यांचे मुलभूत हक्क आणि अधिकार त्यांना मिळालेच पाहिजेत. या आग्रही भूमिकेतून डॉ. बाबासाहेबांनी आंदोलने केली. Publication of Anandavan Buddha Vihara souvenir

कोकणातील कार्यकर्त्यांनी, जनतेने, भक्कम साथ दिली आणि ती आंदोलने यशस्वी झाली. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना तथागत भगवान गौतम बुध्दांचा विज्ञानावर आधारीत अंधश्रध्देला थारा नसलेला मानवाच्या कल्याणाचा धम्म दिला आहे. याच धम्म मार्गाने बाबासाहेबांनी आपल्याला जगाशी जोडले आहे. त्यामुळे आपली दखल जगातील बौध्द राष्ट्र घेत असतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी आपल्या मनात चेतवलेला जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. असे आवाहन राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी केले. Publication of Anandavan Buddha Vihara souvenir
यावेळी व्यासपिठावर भारतीय बौद्ध महासभा शाखा आबलोलीचे अध्यक्ष सुरेश पवार, माजी सभापती चंद्रकांत बाईत, कामगार नेते विठोबादादा पवार, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, खोडदेचे सरपंच लवेश पवार, ग्रामसेवक बाबुराव सुर्यवंशी, माजी गटविकास अधिकारी रविंद्र मोहिते, पोलिस पाटील महेश भाटकर, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे संजय नामदेव पवार, सखाराम सुर्वे, काशिनाथ सुर्वे, अर्जुन सुर्वे, बबनराव कदम, एम.बी. पवार, दत्ताराम कदम, अविनाश कदम, अनिल कदम, धर्मपाल सुर्वे, अनंतराव मोहिते, मिलिंद कदम, सुभाष कदम, शिलवर्धन कदम, प्रमोद पवार, सिध्दार्थ पवार, अशोक कदम, सुरेश रामा पवार, बापू पवार, मंगेश कदम, कुमार कदम, अभिजित पवार, संदिप कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक बबनराव कदम यांनी केले तर सुत्रसंचालन अविनाश कदम, अनिल कदम, मंगेश कदम यांनी केले. Publication of Anandavan Buddha Vihara souvenir
