• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आम्हाला विचारल्याशिवाय शिक्षक पाठवू नयेत

by Mayuresh Patnakar
September 25, 2026
in Guhagar
48 1
0
आम्हाला विचारल्याशिवाय शिक्षक पाठवू नयेत

????????????

95
SHARES
270
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिक्षक बदल्यांवरून लोकप्रतिनिधी पंचायत समितीची मासिक सभेत आक्रमक

गुहागर, ता. 25 : तालुक्यासाठी मुळातच ११४ शिक्षक संख्या कमी आहेत. अशामध्येच आणखी ३९ शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या आहेत. आत्ता पुन्हा १४ शिक्षक जाणार आहेत असे समजते. यावरून लोकप्रतिनिधींनी पंचायत समिती सभेत आक्रमक भूमिका घेतली. तालुक्यातील शाळा ओस पाडायच्या आहेत का? बदली झालेल्या एकाही शिक्षकाला आम्हाला विचारल्याशिवाय पाठवू नयेत, असा आदेश सभापती व उपसभापती यांनी गुहागर शिक्षण विभागाला दिला आहे. Public representatives aggressive over teacher transfers

बदली शिक्षक मिळाल्याशिवाय शिक्षकच पाठवू नयेत, असा ठराव यावेळी घेण्यात आला. यावेळी तालुक्यामध्ये पाच गुंठे क्षेत्रावर संविधान भवन उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सरदेसाई यांनी सांगितले. गुहागर पंचायत समिती सभागृहात सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील शिक्षकांच्या कमी संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. Public representatives aggressive over teacher transfers

आपल्या सोयीच्या ठिकाणी जाण्याकरिता शिक्षक जिल्हा पातळीवर फेऱ्या मारून बदली करून घेत आहेत. तालुक्यातील कमी शिक्षक संख्येमध्ये शाळा चालवणे कठीण बनले आहे. तालुक्यातील जनतेला आम्हाला उत्तर द्यावे लागते. यामुळे बदली झालेल्या एकाही शिक्षकाला आम्हाला विचारल्याशिवाय गुहागरमधून पाठवण्यात येऊ नये, असा निर्णय यावेळी सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांनी एकमुखी घेतला. गणेशोत्सवादरम्यान तालुक्यात मलेरिया व डेंग्यूची साथ होती. या साथीमध्ये ३४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती देताना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर मलेरिया व डेंगूचे रुग्णही प्रवासी रुग्ण होते. त्यांच्यावर आरोग्य विभागातून योग्य उपचार करण्यात आले असून एका विशिष्ठ भागामध्ये मोठी कोणतीही साथ नाही, असे यावेळी स्पष्ट केले. Public representatives aggressive over teacher transfers

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने हळवी भात शेती पिवळी पडू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी तुडतुडा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी शेतकरी योग्य फवारणी करत असून कृषी विभागही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. तालुक्यात कोठेही धोकादायक लोखंडी साकव असतील तर तातडीने कळवावे. जेणेकरून कोणताही अपघात घडू नये याची काळजी घेता येईल. पंधरावा वित आयोगचा निधी यासाठी उपयोगात आणता येत नाही. त्याऐवजी अन्य काम घेऊन सदर निधी उपयोगात आणावा, अशा सूचनाहीं बांधकाम विभागाला करण्यात आल्या. Public representatives aggressive over teacher transfers

यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य व प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पशु विभागाने सहकार्य करावे अॅपद्वारे जनावरांचे वीमा उतरण्याबाबतची माहिती पशु विभागाच्यावतीने देण्यात आली. तसेच गुहागर, रानवी, शृंगारतळी, आबलोली परिसरात असलेल्या उनाड गुरांच्या कानाला टॅगिंग केले आहे. त्या टॅगिंगनुसर सदर गुरांचे मालक शोघता येतील यासाठी पशु संवर्धनने सहकार्य करावे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असे सांगण्यापेक्षा थोडासा वेळ देऊन या उनाड गुरामुळे होत असलेले अपघात थांबवण्यासाठी पशु विभागाने सहकार्य केल्यास संबंधित मालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपसभापती नीलेश सुर्वे यांनी सांगत पशु संवर्धन विभागाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. Public representatives aggressive over teacher transfers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublic representatives aggressive over teacher transfersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.