२००९ च्या निवडणुकीत माझ्या पक्षानेच मला पाडले रामदास कदम
गुहागर, ता. 11 : 2009 मध्ये मी दापोलीतून तिकीट मागितले होते. मात्र, मला मुद्दामून पाडण्यासाठी आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी गुहागरची उमेदवार दिली गेली. मी पडलो याचे वाईट वाटत नाही, तर मला आपल्याच पक्षाने पाडल्याचे दुःख झाले. विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. परंतु, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून त्यांनी आणि सहावेळा ज्यांच्या खासदारकीसाठी प्रामाणिक काम केले, त्या गीतेंनी रामदास कदमला मते देऊ नका, डॉ. नातूंना द्या, असे सांगितले असा खळबजनक आरोप माजी पर्यावरण मंत्री तथा सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला. जोपर्यंत गुहागर विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास होत नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा या मतदारसंघावर डौलाने फडकुया, असे आवाहन त्यांनी केले. Public meeting at Sringaratali


गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने शृंगारतळी येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. भास्कर जाधव, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. गुहागरमध्ये माझा पराभव झाला तो केवळ अनंत गीते यांच्यामुळे. आबलोली गावात तेथील मतदारांना मला मते देऊ नका, असे गीते यांनी सांगितले होते. यानंतर मी स्वतः खात्री करण्यासाठी त्या मतदारांकडून गीते यांना फोन करायला सांगितला. त्यावेळी गीते यांनी रामदास कदम यांना मते टाकू नका असे सांगितल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. तसेच बाळासाहेबांनी डॉ. विनय नातू यांना फोन करुन सेनेच्या कोट्यातून विधानपरिषद देण्याचे कबूल केले होते. मात्र, नातू यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे येथे माझा पराभव झाला आणि भास्कर जाधव यांचे फावले, अशी टीका केली. सहावेळा खासदारकी मिळूनही अलिबाग ते गुहागर पर्यंत गीतेने असे एक तरी चांगले काम केल्याचे दाखवावे असे खुले आव्हान कदम यांनी दिले. एकदा निवडून गेल्यावर परत मतदार संघात फिरकायचे नाही आणि दिसलेच तर समजा निवडणूक आल्या असा टोला त्यांनी लगावला. समाजाच्या नावावर मते घेऊन समाजालाच फसव्हायचे. समाजातील तरुणांना किती नोकऱ्या दिल्या ते त्यांनी सांगावे. कदम यांनी आ. जाधवांचाही खूरपूस समाचार घेतला. जिकडे जावे तिकडे गुहागरच्या नात्याची चर्चा. हा बाहेर नाचतो, हे मी समजू शकतो. पण आता विधानसभेतही नाचून दाखवू लागला आहे. राष्ट्रवादीने ९ खात्याचे मंत्री केले तरी हा समाधानी नाही. वाळू, खडी, सर्व कामात टक्केवारी, लोटे एमआयडीसी मध्ये सर्व ठेकेदारांची आयमाय काढतो. ज्याने शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला आणि तिथे सर्व मिळाल्यानंतर पवारांच्या ही पाठीत खंजीर खुपसून पुन्हा शिवसेनेत गेलेल्या जाधवांनी आम्हाला एक निष्ठेच्या गोष्टी शिकू नये. मतदारसंघाच्या विकासापेक्षा त्याला स्वतःच्या कुटुंबाचा विकास अधिक वाटतो, म्हणून सर्व कामे आपल्याच घरातून केली जात आहेत, अशी टीका केली. माझा पराभव झाल्यानंतर मी गुहागरकडे १५ वर्षे फिरकलो नाही, ही माझी चूक झाली, असे कबूल करत रामदास कदम यांनी यापुढे गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास करण्याची जबाबदारी मी घेतो. येत्या निवडणुकीत तटकरे साहेबांना गुहागर मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Public meeting at Sringaratali
गुहागरच्या विकासाची जबाबदारी माझी; सेनेच्या मेळाव्यात ठाकरेंसह गीते, जाधवांवर टीका
महाराष्ट्रातील नेतेमंडळी विकासासाठी एकत्र येतात मात्र, कोकणातले नेते कधीच एकत्र येत नाहीत, अशी खंत व्यक्त करुन एकमेकांना खेचण्यात, ओढण्यात व टीका करण्यात तेवढे पुढे असतात असाही आरोप कदम यांनी केला. राज्यात सत्तानाट्यात माझा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे तेवढा निधी मी कोकणच्या व गुहागरच्या विकासासाठी आणणार असल्याचे सांगितले. Public meeting at Sringaratali


खा. तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले १९९० सालपासून रामदासभाई विधीमंडळात होते. तसेच १९९५ ते ९९ मध्ये सुध्दा त्यांनी मंत्रिमंडळात काम केले. आम्ही सत्तेत असताना ते विरोधी पक्षनेते होते. यावेळी भाईंनी तत्वाशी प्रामाणिकपणे राहून विरोधी पक्षनेत्याची भूमिका चांगली बजावली होती, असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी काढले. रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देत असताना कदाचित एखादे काम माझ्याकडून उचलले गेले असले तरी भाईंनी त्यावेळी सहकार्य केले होते. कधी कट कारस्थाने केली नाही. नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली होती. आज खेड-दापोली मतदारसंघाचा जो विकास झाला आहे, तो भाईंच्या या स्वभावामुळेच. आज मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सुमारे चारशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला हे त्याचाच परिपाक आहे. त्यामुळे रामदासभाईंमुळे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या स्वप्नाच्या टप्प्यावरती पाऊल टाकण्याची एक चांगली सुरुवात मुख्यमंत्र्यांचे उपस्थितीमध्ये दापोलीच्या परिसरामध्ये झाली त्याचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो असे गौरोद्गार त्यांनी काढले. Public meeting at Sringaratali


महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काम झाले. त्याचे एक बदललेले चित्र कोकणच्या ठिकाणी मी अनुभवतोय. शिवसेनेचा आज होणारा हा मेळावा येथील शिवसेनेची ताकद या मतदारसंघांमध्ये सुद्धा किती आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे. रामदास कदम यांनी टाकलेले हे पहिले पाऊल आहे. समाज परिवर्तनाची दिशा मनामध्ये ठेवत काम करण्याचा रामदासभाईंचा प्रयत्न असून त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून व राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यात येथील मतदारसंघात विकास होऊ शकतो याची मला जाणीव झाली आहे. Public meeting at Sringaratali


त्यामुळे या सभेच्या निमित्ताने रामदास भाई आणि मी एक संकल्प करुन माणगाव, महाड, अलिबाग, पेण, दापोली, मंडणगड, खेड व गुहागर या विधानसभा मतदारसंघात आपण गतीने काम करु या असे ते म्हणाले. या मेळाव्याला प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी आमदार सदानंद कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राजेंद्र आंब्रे, प्रभाकर शिर्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे, शिवसेना तालुकप्रमुख दीपक कनगुटकर, शहराध्यक्ष निलेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, प्रदेश सरचिटणीस साहिल आरेकर, डॉ. अनिल जोशी, सिकंदर जसनाईक, प्रल्हाद विचारे, अमरदीप परचुरे, मनीष मोरे आदींसह गुहागर, चिपळूण, दापोली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Public meeting at Sringaratali
मेळाव्याकडे भाजपने फिरवली पाठ
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या केलेल्या टीकेने महायुतीतील मित्र पक्ष असलेला भाजप दुखावला आहे. याचे पडसाद आजच्या शिवसेना मेळाव्यावर दिसले. मेळाव्या ठिकाणी व शृंगारतळी बाजारपेठ परिसरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावल्याचे दिसत होते. कुठेच एकही भाजपचा झेंडा दिसत नव्हता. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद दिसणार आहेत. Public meeting at Sringaratali


रामदासभाईंनी गुहागरातून निवडणूक लढवावी
२००९ मध्ये राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आयत्यावेळी गुहागर विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. कमी दिवसात रामदास भाईंनी विद्यमान आ. भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगली मते घेतली होती. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बंड पुकारल्याने आ. जाधव यांचा विजय सोफा झाला होता. दरम्यान, यावेळी महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अन्य मित्र पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. या गुहागर विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी रामदासभाईंनी याठिकाणी निवडणुका लढवावी, अशी मागणी सिकंदर जसनाईक यांनी व्यासपीठावरून केली. Public meeting at Sringaratali